लवकरच नांदगाव शहराचा व तालुक्याचा दुष्काळ मिटणार : सौ अंजुमताई सुहास कांदनांदगाव : आज येवला रोड पाण्याची टाकी येथे माणिकपुंज ते नांदगाव शहर पाणी योजना नवीन पाईपलाईनचे लोकार्पण व पाण्याचा जलपूजन सोहळा पार पडला.
सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते नव्याने झालेल्या पाईपलाईनचे लोकार्पण व ज्या लोकेशन करण्यात आले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या पाईपलाईनसाठी दोन कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले होते.
या आधीची जीर्ण झालेली पाईपलाईन सतत फुटणे किंवा नादुरुस्त होणे या कारणांमुळे पाणीपुरवठ्यामध्ये मोठी अडचण येत होती आणि नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता, यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत होते, या सर्व बाबी लक्षात घेत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ दोन कोटी रुपये मंजूर करून देत माता-भगिनींच्या महत्त्वाच्या अडचणीची दखल घेतली.
या आधीचे पाईपलाईन द्वारे कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे दिवसाला दोन प्रभाग पाणीपुरवठा होत असे पण आता नव्याने झालेल्या पाईपलाईन मुळे दिवसाला चार ते पाच प्रभाग पाणीपुरवठा करता येणे शक्य होईल.
यावेळी नगरपालिकेतर्फे सौ अंजुमताई कांदे यांचा सत्कार धनवट मॅडम यांनी केला.
आपल्या मनोगतात बोलताना अंजुमताई कांदे यांनी उपस्थित महिला भगिनी आणि बांधवांचे निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करत आमच्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल आभार मानले,
गिरणा धरण ते नांदगाव स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण होणार असून माणिकपुंज नांदगाव नव्याने झालेल्या पाईपलाईन मुळे या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही असेही त्या म्हणाल्या, अण्णांच्या प्रयत्नामुळे लवकरच नांदगाव शहर व तालुक्याचा पाण्याचा दुष्काळ मिटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अण्णांवर आपण विश्वास ठेवून त्यांना आमदार केल्याची जाणीव अण्णा कायम ठेवतात आणि म्हणूनच अण्णांचा विकासाचा झंजावात असाच कायमस्वरूपी पुढे चालू राहणार असल्याचा त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी प्रशासक शामकांत जाधव यांनी नागरिकांना उन्हाळ्यात आपल्या गरजेपुरते पाणी वापरल्यानंतर नळ बंद करावे पाण्याचा उपयोग करू नये व पाणी वाया घालू नये अशी विनंती केली.
सुरुवातीला पुरोहितांच्या मंत्रचारात विधिवत पूजा करत जलपूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी नारळ वाहिले, तसेच पेढे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास नांदगाव शहर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील काका सोळसे चेतन पाटील, उद्योजक अनंत कासलीवाल, माजी नगरसेवक नितीन जाधव ॲड.सचिन साळवे, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव प्रकाश शिंदे, अयाज शेख, शशिकांत सोनवणे,
विलास राजोळे, बद्रीनाथ सोनवणे, नाना जाधव,काशिनाथ देशमुख, रवी सोनवणे, बिरू शिंदे आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणीताई मोरे ऍड.विद्याताई कसबे, भारती बागोरे, संगीता निकम सौ निता दराडे, नेहा खटके, रिजवाना शेख, आदींसह नांदगाव नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.