मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उपशिक्षक शानूल सुभाष जगताप सर यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
एच.ए.के.हायस्कूल,मनमाड मध्ये इ. १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर.
मनमाड : इयत्ता १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 1376...







