loader image

मनमाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सवाचा भव्य समारोप

Apr 20, 2025


” भीमा तुझ्या जन्मामुळे” या महानाट्याने रसिकांची मने जिंकली”
मनमाड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात आयोजित भीमोत्सव विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचा समारोप ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या भव्य महानाट्याच्या सादरीकरणाने झाला. या नाट्यप्रयोगाने मनमाडकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.

पोलीस परेड ग्राउंड येथे खुले रंगमंच उभारून सादर करण्यात आलेल्या या नाटकाला हजारो प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिला, युवक आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ मिरवणूक, घोषणाबाजी किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे एवढ्यावर सीमित राहता कामा नये. त्याऐवजी त्यांच्या विचारांचे आचरण, शिक्षणाचा ध्यास, आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार हा संदेश देण्यात आला. “भीमा तुझ्या जन्मामुळे” या नाटकाने हेच दाखवून दिलं – की महापुरुष फक्त गौरवासाठी नसतात, तर समाजाच्या आरशात स्वतःला पाहण्यासाठी असतात.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये डॉ. आंबेडकरांचे शिक्षणप्रेम, सामाजिक विषमतेविरुद्ध लढा, संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि बौद्ध धम्म स्वीकृती यांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. यामध्ये आंबेडकरांच्या बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा प्रवास अत्यंत संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण शैलीत साकारण्यात आला.

नाटकातील प्रसंग, प्रकाश योजना, संगीत संयोजन आणि संवादफेक यांनी प्रेक्षकांना भावनिक करत अनेकांना डोळ्यांत अश्रू आणले. अनेकांनी हे नाटक पुन्हा पाहावे अशी मागणी व्यक्त केली.

संपूर्ण परिसरात या वेळी ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ ‘जय भीम’ घोषणांनी आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.

भीमोत्सव समितीचे कार्यकर्ते राजेंद्र पगारे, अमोल खरे, अनिल निरभवणे, दिनकर धिवर, संजय कटारे, निलेश वाघ, रवी गायकवाड, नितीन लालसरे, मयुर बोरसे, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्यांनीही नाटकानंतर आपले मनोगत व्यक्त करत नाट्यसंहितेची आणि कलाकारांच्या मेहनतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.