loader image
[ays_poll id=7]

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

May 6, 2025


 

तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या ठिकाणची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा व तालुक्याला टँकरमुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार संजय पवार यांच्यासह तालुक्यातील पाणी प्रश्नी जाण असणाऱ्या पदाधिकारी व विविधशासकीय खातेप्रमुख यांच्या संयुक्त बैठकीत आमदार सुहास कांदे बोलत होते पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी यंदा सगळी मेहनत केवळ शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहचावे यासाठी आमदार कांदे यांनी शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाचा भाग म्हणून आज आमदार कांदे यांनी तालुक्यातील उपलब्ध जलसाठे त्यातील क्षमता याचा सांगोपांग आढावा घेतला जलसंधारण ची कामे वाढविण्यासोबत गाळ काढण्याचा कृती आराखडा निश्चित करावा त्यासाठी देवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखविला
जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिकपुंज धरणामागील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली समाधान पाटील यांनी पांझण मन्याड शाखांबरी लेंडी व अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण असलेला तालुका अंतर्गत नदीजोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली.
यावेळी तहसीलदार सुनील सौंदाने गटविकास अधिकारी पाठक , तालुका कृषी अधिकारी डांबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग मालेगाव अंकिता वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण उपविभाग मालेगाव उप अभियंता माणिकपुंज प्रकल्प नागासागा प्रकल्प गिरणा धरण प्रकल्प सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहयो नांदगाव.
तसेच
या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश कवडे, माजी आमदार संजय पवार, बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर, अमोल नावंदर, सतीश बोरसे ,किशोर लहाने, समाधान पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे ,शरद सोनवणे ,नितीन आहेर ,ॲड. अमोल आहेर, भैय्यासाहेब पगार आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.