loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर नंदुरबार जिल्हासंघाच्या कर्णधारपदी

May 10, 2025


 

शनिवार 10 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्हा संघातर्फे खेळत आहे.

2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात स्पर्धेतील चौथ्या सामण्यात खुशालला स्पर्धेत आपल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार जिल्हा संघाच्या कर्णधारपदी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनचे सचिव युवराज पाटिल सर यांनी नियुक्त केले.

आतापर्यंत या स्पर्धेत खुशालने नंदुरबार संघासाठी एक शतक, एक अर्धशतक लगावले आहे व त्यासोबतच गोलंदाजीमध्ये नंदुरबार संघासाठी महत्वाचे बळी टिपण्यात त्याने यश मिळवले आहे. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामण्यात 11 षटकात जळगाव अंडर 16 संघाचे चार फलंदाजही खुशालने टिपले.

खुशाल हा खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमीत मनमाड येथे सराव करत असुन सध्या मनमाडचे नेतृत्व नंदुरबार संघात करित आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या कामगीरिसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळडुला प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.