loader image

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील गौरव नितेचे सहा बळी

May 14, 2025


 

मंगळवार 13 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्हा संघातर्फे छ. संभाजीनगर येथे खेळत आहे.

2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील गौरव निते याने छ.संभाजीनगर अंडर 16 संघाविरुध्द खेळताना आपल्या फिरकी गोलंदाजीवर 06 बळी मिळवण्यात यश मिळवले व या स्पर्धेतील आपले वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन केले. या जिल्हास्तरीय स्पर्धेतील गौरवचा हा दुसराच सामना असुन या प्रकारच्या प्रदर्शनाचे कौतुक होत आहे.

हा खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमीत सराव करत असुन सध्या मनमाडचे नेतृत्व नंदुरबार जिल्हा संघात करित आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

या कामगीरिसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल , रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळडुला प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन लाभले.

 


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील दक्ष पाटिल, हसन शेख, रुषी शर्मा, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.