loader image

१११ रक्तदात्यांचे येवल्यात उत्स्फूर्त रक्तदान

May 19, 2025


 

 

येवला : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त येथे भाजपच्या वतीने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. येवला मर्चेंट बँकेच्या सभागृहात शिबिरात महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत १११ जणांनी रक्तदान केले.

महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेंव्हापासून येवल्यात त्यांनी विविध कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. येथील युवानेते समीर समदडिया यांच्या माध्यमातून आत्ताही सुमारे सात कोटींची कामे शहरात मंजूर झाली आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उदघाटन तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक धीरज महाजन, समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया, माजी नगरसेवक गणेश शिंदे, नानासाहेब लहरे, राजू परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब गाडेकर, तरंग गुजराथी यांनी प्रयत्न व आयोजन केले. विशेष म्हणजे, भाजपसह दोन्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या कार्यकर्त्यांनीही शिबिरात सहभाग नोंदविला.

उद्घाटनप्रसंगी भाजपने विकासाला चालना दिल्याचे सांगत
महाजन यांनी नेहमीच सामाजिक हिताची भूमिका बजावली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भाजपने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविल्याची भावना ही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. शिबिरासाठी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, प्रमोद सस्कर, धनंजय कुलकर्णी, नितीन काबरा, प्रवीण बनकर, अल्केश कासलीवाल, दीपक लोणारी, अतुल घटे, गौरव

कांबळे, दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, सुनील काटवे, मयूर मेघराज, धीरज परदेशी, कुलदीप परदेशी, विशाल परदेशी, सुनौल बाबर, विशाल काथवटे, दीपक टकले, जितेंद्र कन्हेकर, बाळासाहेब कुन्हे, कृष्णा कव्हात, मिलन पाटील, अरुण आव्हाड, संजय जाधव, सचिन शेळके, शरद कदम, संतोष नागपुरे, गोटू मांजरे, डॉ. महेश जोशी, डॉ. राजीव चंडालिया, डॉ. जयप्रकाश कारवा, सुमित थोरात, अक्षय राजपूत, विनोद नागपुरे, गणेश गायकवाड, वैभव खेरूड, राहुल भावसार, मुकेश भावसार, कुणाल भावसार, यश समदडिया, छाया क्षीरसागर, ज्योती कापुरे, रत्ना गवळी, अनुपमा मढे, सविता बाबर आदोंसह कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तसंकलन समता ब्लड बँक, नाशिक यांच्या वतीने डॉ. हिना शेख, डॉ. श्रद्धा मासुरत्य डॉ. प्रतीक्षा व्हावळ, कृष्ण’ करण त्रिभुवन यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.