loader image

नॅशनल हायवे ७५३ जे वर जलवाहिनी गळतीने अपघाताचा धोका

May 26, 2025


नांदगाव, मारुती जगधने चाळीसगाव नांदगाव रोडवरील
नॅशनल हायवे क्रमांक ७५३ जे वर नांदगाव येथील रहदारी बंगल्याजवळ गेल्या सहा महिन्यांपासून जलवाहिनीची गंभीर गळती सुरू आहे. ही जलवाहिनी सातत्याने गळती होत असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते आणि वारंवार खड्डे तयार होतात. प्रशासनाकडून काही वेळा दुरुस्ती करण्यात आली असली तरी समस्या कायमस्वरूपी सुटलेली नाही.

विशेष म्हणजे या ठिकाणी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अधांतरी ठेवण्यात आले असून, रस्त्याच्या कडेला लोखंडी जाळ्या, मिक्सर मशीन आणि इतर साहित्य आडवे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज लागत नाही आणि अपघाताचा धोका वाढत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, यामुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात घडले असून, रस्त्याच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. “गेल्या सहा महिन्यांपासून ही अवस्था आहे. अनेक वेळा मौखिक तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय केले गेले नाहीत,” असे स्थानिकांनी सांगितले.

वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी, जलवाहिनीची गळती कायमस्वरूपी थांबवावी, आणि रस्त्यावरील अडथळे दूर करून रहदारी सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नांदगाव शहरातील रदरी बंगल्यासमोर नॅशनल हायवेवरील जलवाहिनीची गळती सातत्याने होत आहे वारंवार ती गळती काढूनही ती कायम आहे त्यामुळे या ठिकाणी मिक्सर आणि जाळ्या लावून ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी रेल्वेचे म** धक्का गोडाऊन आहे येथे दिवसभरात शेकडो वाहने येजा करतात आणि त्यातल्या त्यात नॅशनल हायवे सातत्याने वाहत असतो त्यामुळे येथे यापूर्वी अपघात झालेले आहे आता मी गंभीर ऑफ द अपघाताची संभाव्य शक्यता आहे यावर तात्काळ उपयोजनांची गरज आहे हे घोंगड किती दिवस भिजत ठेवणार असा सवाल देखील केला जातो.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.