मनमाड – मनमाड पासून जवळच असलेल्या रायपूर तालुका चांदवड येथील रामदास सिताराम आहेर
वय 45 गट नंबर 83 लगत भडाणे रायपूर शिव रस्ता रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परतताना दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने मृत झाले.
याबाबत अधिक वृत्त असे की सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवरती जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकावला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे निदर्शनात आले व रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती भागवत झालटे यांना दिली व त्यांनी तत्काळ वन विभागाला बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली रात्री पंचनामेसाठी शासकीय रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आले वन विभागाची पुढील पंचनामा तपास चालू आहे अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे यांनी दिली.त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आहे वडील मोठे बंधू असा त्यांचा परिवार आहे.या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले आता लावण्यात आले आहे. भागवत झाल्टे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनीही शासनाकडून जी मदत होईल आम्ही प्रयत्न करू असे भागवत झाल्टे यांनी असे सांगितले की परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे सर्वांनी काळजी घ्यावी शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान
मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...