loader image

नांदगावात १६.३९ लाखांचा गुटखा जप्त – पोलिसांची धडक कारवाई

Jun 8, 2025


नांदगाव :

नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १६ लाख ३९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, संबंधित दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा बुलेरो पिकअप (क्रमांक MH19 BM 0823) ही गाडी बेळगाव येथून नांदगावकडे येत होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची शक्यता होती.

याअनुषंगाने नांदगाव पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, १६.३९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

या प्रकरणात निलेश दिलीपचंद बोथरा व महेश रमेश आहेर, (दोघे रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक कारवाई सुरू आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विशेष मेहनत घेतली.

नांदगाव पोलिसांची ही धडक कारवाई स्थानिक गुन्हेगारीवर आळा बसवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.