Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

Jun 16, 2025

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात झालेल्या धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आले असून या प्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १ किलो ५५.८५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ११ जून २०२५ रोजी मुर्तजा रस्सीवाला आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला आणि १,२०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ८ लाख रुपये रोख रक्कम चोरली. या घटनेची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली (गु. रजि. नं. ३५९/२०२५, भा.द.वि. कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३(५)). नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मनमाड) बाजीराव महाजन यांनी तातडीने दखल घेत तपासासाठी मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक माहिती, श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ञ आणि फॉरेन्सिक टिमच्या सहाय्याने तपासाची दिशा निश्चित केली. गुन्हेगारांनी वापरलेली पद्धत आणि परिसरातील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पोलिसांनी मनमाड आणि चांदवड परिसरातील सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार, खालील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
१. संजय किशोर गायकवाड (वय ३५, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड)
२. राकेश अशोक संसारे (वय ३०, रा. आनंदवाडी, सुभाषनगर, मनमाड)
३. राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या (वय ३०, रा. मदिना चौक, नाशिक; मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश)
चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूल जबानी दिली. त्यांच्याकडून १,०५५.८५० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १ कोटी ५ लाख ४० हजार रुपये) आणि गुन्ह्यासाठी वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली. उर्वरित मालमत्तेच्या शोधासाठी तपास सुरू आहे.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
– राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैय्या: याच्यावर नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ घरफोड्या, १ दरोडा तयारी, ४ चोऱ्या आणि १ जबरी चोरी असे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. हा अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमधून जामिनावर सुटला होता.
– संजय किशोर गायकवाड: यांच्यावर मनमाड आणि इतर ठिकाणी ५ घरफोड्या, २ चोऱ्या, १ दुखापत आणि इतर कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल आहेत.

– राकेश अशोक संसारे: याच्यावर १ गंभीर दुखापत, १ चोरी, १ दंगा आणि रेल्वे कायद्यांतर्गत ४ गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांनी या तिन्ही सराईत गुन्हेगारांना अटक करून मोठी कामगिरी केली असून, याप्रकरणी आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक
या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि किशोर जोशी, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार माधव साळे, धनंजय शिलावटे, प्रवीण काकड, विशाल आव्हाड, रावसाहेब कांबळे, प्रितम लोखंडे, श्रीकांत गारूंगे, सागर काकड, शैलेश गांगुर्डे, गोरक्षनाथ संवत्सरकर, योगिता काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, केतन कापसे, दत्ता माळी, हरिष माळी, अमोल गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या यशस्वी कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.
नागरिकांना आवाहन
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना घरात मौल्यवान वस्तू ठेवताना खबरदारी घेण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-form][contact-field label="Name" type="name" required="true" /][contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]