मनमाड – रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक चे कार्यवाह
शैलेश पंडित, सह कार्यवाह
मदन भंदुरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनमाड जनकल्याण प्रकल्प समिती ची बैठक संपन्न झाली मनमाड शहरात
जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक यांच्या वतीने रक्त साठवण केंद्र सुरु करण्यात आले आहे या केंद्रा च्या कार्यात गती देणेवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली मनमाड शहर व परिसरात नवरक्तदाते तयार करणे साठी युवकां मध्ये प्रबोधन करणे साठी आगामी काळात उपक्रम घेण्यावर चर्चा झाली, महिलांवर्गात हिमोग्लोबिन जागृती साठी कार्यक्रम करणे संबंधित विषयी चर्चा झाली आगामी काळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे तसेच रक्तदान शिबीर संयोजक चे एकत्रित करणं करून रक्तदान चळवळ वृद्धिंगत करणे साठी विविध उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले या बैठकीत जनकल्याण रक्त केंद्र नाशिकचे संचालक प्रदीप गुजराथी भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, रा. स्व. संघा चे रमाकांत मंत्री, प्रमोद मुळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट बेदमुथा, भाजपा मनमाड शहर सरचिटणीस आनंद काकडे, डॉ. सौ संगिता हाके, स्नेहल भागवत, देवराम सदगीर, परेश राऊत, गणेश हडपे जनकल्याण रक्तकेंद्र चे जनसंपर्क प्रमुख सुरेश पिंगळे आदी प्रमुख समिती सदस्य नी चर्चेत सहभाग घेतला बैठकी चे संयोजन प्रदीप गुजराथी व आनंद काकडे यांनी केले.

जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...