loader image

मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. अश्विनी खैरणार यांची बिनविरोध निवड

Jun 18, 2025


 

सोमनाथ घोगांणे
नांदगाव प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अश्विनी मुकुंदा खैरनार यांची बिनविरोध निवड झाली..आवर्तन पद्धतीने ठरल्यानुसार चित्रा मधुकर इघे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मंगळवारी ( दि.१७ ) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सरपंचपदासाठी अश्विनी खैरनार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला..निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुवर्णा गोडे व सहाय्यक निवडणुक अधिकारी तलाठी सचिन मोरे यांनी अश्विनी खैरनार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यांना ग्रामपंचायत अधिकारी आर. एम मगर, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले..या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या सारिका जेजुरकर, चित्रा इघे, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे,सुनंदा झेंडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते. या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. नवनिर्वाचीत सरपंच अश्विनी खैरणार यांचे तालुक्याचे आ . सुहास कांदे यांच्या वतीने युवा नेते सागर हिरे ‘ बाजार समिती संचालक अमोल नावंदर तसेच बाजार समितीचे माजी सभापती सतीष बोरसे ‘ अर्जुन ( बंडू ) पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले यावेळी जि. प माजी सदस्य रमेश बोरसे ‘ शिवाजीराव पाटील ‘ संजय सानप ‘ संतोष गुप्ता ‘ डॉ. वाय. पी. जाधव ‘ बाजार समितीचे सचीव अमोल खैरणार ‘ नानू कवडे यांनी अभिनंदन केले यावेळी दिपक कासलीवाल ‘ गोकुळ खैरणार ‘ बाळासाहेब गोराडे ‘ संदीप खैरणार ‘ ओमप्रकाश अग्रवाल ‘ शामसुंदर धूत ‘ अशोक पाटील ‘ भय्या संगवे ‘ आनंदशेट चोरडीया ‘ समाधान भोसले ‘ सुनील भवर ‘ समता परिषदेच्या सौ. चंदकला बोरसे यांचेसह मल्हारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.