Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

Jul 20, 2025

.

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025
मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर .

मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे 12 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या94व्या वर्षी निधन झाले. कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे कार्य शेतकरी, स्वातंत्र्य चळवळीत, खंडकरी शेतकरी प्रदिर्घ लढ्यातून जमीन मिळवून दिली आहे. सहकार क्षेत्रात हि छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष होते 32 वर्ष पूर्वी स्थापन केलेल्या पथसंस्थेचे8 शाखा कार्यरत आहेत. हौसिग सोसाईटी उभ्या केल्या आहेत. त्यातून अनेकांना घरे मिळालेत आहेत, नांदगाव विधानसभेचे आमदार, 6 वर्ष विधांन परिषेद विरोधी पक्षनेते, मनमाड नगर पालिका चे थेट नगराध्यक्ष,भाकप महाराष्ट्र चे12 वर्ष राज्य सरचिटणीस, किसान सभेचे 15 वर्ष अद्यक्ष पद भूषविले. आयटक संलग्न नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन, आदी चळवळीत 75 वर्ष योगदान दिले आहे.
कॉम्रेड माधवराव गायकवाड(बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार क्षेत्र आदी संदर्भात उपक्रम राबविले जातात. आज कॉम्रेड माधवराव गायकवाड 18 जुलै जन्मदिनी 2025ह्या वर्षी कॉम्रेड माधवराव गायकवाड 7 व्यां स्मृती दिनी जीवनगौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ कम्युनिस्ट साम्यवादी नेते, भाई माजी आमदार जयंत पाटील ( अलिबाग) निवड केली आहे. रोख रक्कम 51हजार रुपये स्मृती चिन्ह, गौरवपत्र ,शाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . सदर पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात कर्मभूमीत अलिबाग येथे कॉ. माधवराव गायकवाड बाबूजी स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणारं आहे. या आधी हा पुरस्कार खा. राजू शेट्टी, कॉ. एम ए पाटील, कॉ . अण्णासाहेब थोरात,कॉ. मोहन शर्मा, कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. सूकुमार दामले , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ भालचंद्र कांगो यांना देण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक येथे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. कॉम्रेड साधना गायकवाड, सचिव कॉ. राजू देसले, यांनी दिली.विश्वस्त भास्कर शिंदे, , श्याम गरुड, व्ही डी धनवटे, सुभाष बेदमुथा, शबूशेट शिरसाठ, दत्तू तुपे, रिकब जैन, निखिल स्वर्गे, डॉ रामदास भोंग, देविदास भोपळे , साहेबराव गंभीरे होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष राज्यभर साजरे केले जात आहे. या निमीत्ताने जेष्ठ नेते कॉ.माधवराव गायकवाड त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शेतकरी चळवळ, सहकार, क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव ग्रंथ संपादित करण्यात येणार, विवीध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य चे पहिले विरोधी पक्षनेते विधान परिषद होते.
भाई जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे राज्य
सरचिटणीस वयाची 70 वर्ष पूर्ण होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष नेते भाई एन डी पाटील, जेष्ठ कमुनिस्ट नेते कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. ए बी बर्धन, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सोबत काम केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष शतक महोत्सवी वर्षी , उच्च शिक्षण घेऊनही पूर्णवेळ चळवळी साठी आयुष्य वेचणारे नेते भाई जयंत पाटील यांचा गौरव करताना आनंद होत आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]