मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ‘ मातृ पितृ दिन ‘ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेतील कु.समीक्षा राजू लहिरे या विद्यार्थिनीचे आई- वडिल श्री. राजू हरी लहिरे (शिक्षक,कवी पत्रकार )व सौ. वैशाली राजू लहरे यांना या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मान देण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना त्याचप्रमाणे शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री राजू हरी लहरे यांनी आपल्या भाषणातून आई-वडिलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व आई-वडिलांची महती सांगणा-या कविता देखील सादर केल्यात. आपल्या अध्यक्षीय भाषणातून फादर माल्कम नातो यांनी मुलांच्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे विषद केले. कुमार साई संतोष पवार याने आपल्या भाषणातून माता-पिता संस्कृतीचं महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सिद्धार्थ दत्तात्रय माळी याने केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अशोक गायकवाड सर यांनी करून दिला. शालेय गायन ग्रुपने आई-वडिलांच्या महतीचे गीत सादर करून वातावरण भाव विभोर केले. आभार प्रदर्शन कुमारी चंचल रंगनाथ ढोमसे हिने केले. कुमारी आराध्या निलेश धात्रक व कुमार प्रेरित संदेश खरात या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरात 33 रक्त बॅगचे संकलन
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय,मनमाड येथे रक्तदान...









