loader image

अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Aug 11, 2025


भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना जय भवानी व्यायाम शाळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यातील व मनमाड शहरातील पहिल्या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेला महिला खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला
स्पर्धेचे उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोद्दार माजी नगराध्यक्ष योगेश पाटील जय भवानी व्यायाम शाळेचे पोपट शेठ बेदमुथा डॉक्टर दत्ता शिंपी राजेश परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता काळे आकांक्षा व्यवहारे व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले
आठ विविध वजनी गटात झालेल्या नाशिक जिल्हास्तरीय अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
44 किलो
प्रथम दिव्या सोनवणे
द्वितीय श्रेया सोनार
तृतीय भाग्यश्री पवार

48 किलो
प्रथम विनाताई आहेर
द्वितीय श्रावणी पुरंदरे
तृतीय वैष्णवी शुक्ला

53 किलो
प्रथम मेघा आहेर
द्वितीय पूर्वा मौर्य
तृतीय शामल तायडे

58 किलो
प्रथम आर्या पगार
द्वितीय मुग्धा माळी
तृतीय कावेरी वाबळे

63 किलो
प्रथम प्रांजल आंधळे
द्वितीय साक्षी पवार
तृतीय हर्षिता कुंगर

69 किलो
प्रथम अक्षरा व्यवहारे
द्वितीय श्रावणी सोनार
तृतीय श्रावणी मंडलिक

77 किलो
प्रथम करुणा गाढे
द्वितीय प्रांजल कुनगर
तृतीय ऐश्वर्या गांगुर्डे

77 किलो वरील
प्रथम कस्तुरी कातकडे
द्वितीय श्रद्धा माळवतकर
तृतीय करिष्मा शहा

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा बहुमान मेघा संतोष आहेर हिने पटकावला
स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून डॉ विजय देशमुख राजेंद्र सोनवणे सुनील दळवी योगेश चव्हाण योगेश महाजन तुषार सपकाळे कल्पेश महाजन भाऊसाहेब खरात पंकज त्रिवेदी यांनी कामकाज बघितले
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट भेट दिले
विनोद सांगळे यांनी त्यांचे वडील कै बंडू नानासांगळे यांचे स्मरणार्थ स्मृतीचिन्ह प्रदान केले
डॉ शरद शिंदे नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनी स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिले
स्पर्धेचे प्रास्ताविक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी केले सूत्रसंचालन आनंद काकडे आभार प्रदर्शन प्रशांत सानप व अध्यक्षीय मनोगत डॉक्टर दत्ता शिंपी यांनी केले
स्पर्धेचे यशस्वी आयोजन कुणाल गायकवाड मुकेश निकाळे मुकुंद आहेर जयराज परदेशी पूजा परदेशी खुशाली गांगुर्डे नूतन दराडे पवन निर्भवणे सुनील कांगणे सुरेश नेटारे यांनी केले
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी मा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.