Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेट झेवियर हायस्कूल ,मनमाड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

Aug 13, 2025

मनमाड (वार्ताहर ) सेंट झेवियर हायस्कूल मनमाड, येथे नांदगाव तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री .प्रमोद चिंचोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. शिक्षण विस्तार अधिकारी नाईकवाडे साहेब, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मा. संचालक प्रसाद पंचवाघ , छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या मा. मुख्याध्यापिका सौ. संगीता पोतदार सेंट झेवियर विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक फादर मॅलकम नातो, मा.पर्यवेक्षक निकाळे सर उपस्थित होते.
नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. संजय बच्छाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा.शिक्षण विस्तार अधिकारी नाईकवाडे साहेब यांनी विज्ञान मेळाव्याचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रमोद चिंचोले यांनी यांनी क्वांटम युग संभाव्यता आणि आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश नान्नोर यांनी केले व आभार सौ. अंजली झेवियर यांनी मानले
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅलकम नातो, सर्व विज्ञान शिक्षक , विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर नियोजन केले . प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना प्रमाणपत्र वाटप करून प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देखील देण्यात आली.
नांदगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळावा 2025-26 निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक—वेदिका संजय जाधव
न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव
द्वितीय क्रमांक—-गायकवाड आसावरी ज्ञानेश्वर व्ही, जे ,हायस्कूल नांदगाव. . तृतीय क्रमांक–सिद्धेश मंगेश वाणी
छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड
उत्तेजनार्थ. स्वामिनी हेमंत कातकडे
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड
कार्यक्रमास ज्येष्ठ विज्ञान शिक्षक व खजिनदार व्ही.जी. कदम, उपाध्यक्ष उमेश पाटील, सदस्य आत्माराम बोरसे, सौ देसले ए.बी., सौंदाणे जे .व्ही., सौ . कायस्थ व्ही.बी., श्रीमती सांगळे दि.द., माताडे जी. व्ही ., साजिद खान., एस .पी. मगर उपस्थित होते

प्रा.सौ.योगिता हिरे ,प्रा.सौ.सविता पवार (मनमाड महाविद्यालय) यांनी परीक्षणाचे काम केले

अजून बातम्या वाचा..

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]