loader image

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत

Aug 17, 2025


मनमाड — “स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्या तुटणं नव्हे, तर स्वतःच्या विकासासाठी आणि देशसेवेच्या संधीचं सोने करणं होय,” असे स्पष्ट प्रतिपादन नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार अमोल खरे यांनी केले. बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल, मनमाड येथे १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित ध्वजारोहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी शिक्षण, प्रामाणिकपणा, कष्ट, व समाजसेवा या मूल्यांची महत्ता अधोरेखित करताना सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा. शिक्षणासोबतच स्वच्छता, पर्यावरण रक्षण, स्त्रीसमानता आणि भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी आपण कटिबद्ध असायला हवे.”

समारंभाच्या मंचावर शाळेचे संस्थापक भागवत दरगुडे, सुरज दरगुडे, अफ्रिकन फॉरेनर बेंजामिन अपॉग, आणि पोलीस महिला दीपाली आव्हाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या मिस कॅरोलीन जोसेफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तिपर भाषणे सादर करत स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, ज्वलंत इतिहासाची आठवण करून देणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांड आणि ऑपरेशन सिंदूर यावर आधारित नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची भावना व्यक्त केली. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीत पोशाखात देशभक्तीपर नृत्यांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले.

कार्यक्रमात महिला पोलीस दीपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवनाविरोधात शपथ दिली. तर, बेंजामिन अपॉग यांनी भारताविषयी आपले प्रेम व आदर व्यक्त करत, भारताची संस्कृती आणि मूल्यव्यवस्था यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अध्यक्ष निलेश दरगुडे, प्रदीप दरगुडे, शाळेचे प्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. पालकवर्गानेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले. उपस्थितांनी भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमवून टाकला.

फोटो
मनमाड : दरगुडे पब्लिक स्कुलमध्ये ध्वजारोहण करताना पत्रकार अमोल खरे, भागवत दरगुडे, सुरज दरगुडे, अफ्रिकन फॉरेनर बेंजामिन अपॉग, दीपाली आव्हाड, प्राचार्या मिस कॅरोलीन जोसेफ


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.