महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड येथील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कोमल साहेबराव अहिरे हिची वनरक्षक पदी नियुक्ती झाली. कोमल हिने अतिशय खडतर परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन या यशाला गवसणी घातली . या यशामुळे महाविद्यालयात आणि परिसरात कौतुकाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण विठ्ठल पाटील, यांनी विशेष सत्कार व हार्दिक अभिनंदन केले असून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी. व्हि. सोनवणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जी.एल.शेंडगे, डॉ.सुनील घुगे, डॉ.पंढरीनाथ दिसागज उपस्थित होते.