loader image

साईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची भारतीय संघात निवड

Aug 24, 2025


आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची सलग सहव्या वेळेस भारतीय संघात निवड करण्यात आली असून अहमदाबाद येथे २४ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ चैम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ८८ किलो वजनी गटात साईराज राजेश परदेशी हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे
महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून तृप्ती ची ही सलग नववी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे
मनमाड सारख्या छोट्या शहरातील खेळाडू व प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत ही समस्त मनमाड करांसाठी अभिमानाची बाब आहे
भारताचे पंतप्रधान यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साईराज चा गौरव केला होता
साईराज पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे
साईराज परदेशीला वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आलोकेश बरवा डी डी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी मा नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी साईराज चे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.