loader image

छत्रेच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून घडविले गणेशमूर्ती

Aug 25, 2025


 

मनमाड : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमांतर्गत शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक व पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ सर, संचालक व उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे सर, संचालक जोशी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पोतदार मॅडम व पर्यवेक्षिका सौ. चांदवडकर मॅडम ज्येष्ठ शिक्षक भामरे सर, अंबर्डेकरसर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

विद्यार्थ्यांना शाडू माती उपलब्ध करून देण्याचे कार्य राष्ट्रीय हरित सेनेचे गुजर सर, ठाकरे सर व अंबड्रेकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनोभावे व कल्पकतेने गणेशमूर्ती तयार केल्या. विशेष म्हणजे, सहभागी विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करणार असून पर्यावरणपूरक सजावट करणार आहेत, ज्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोहोचणार नाही
या स्पर्धेच्या पर्यवेक्षणाचे काम सौ झांबरे मॅडम व सौ एस. यू. देशपांडे मॅडम यांनी केले

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
🥇 प्रथम क्रमांक : ऋत्विक राजेंद्र ठाकरे (10वी अ)
🥈 द्वितीय क्रमांक : नकुल मनोज बडगुजर (8वी अ)
🥉 तृतीय क्रमांक : विरेन विजय साबळे (8वी फ)
✨ उत्तेजनार्थ : सायली सतीश शहाणे (8वी क)
🏅 पाचवा क्रमांक : रोशनी जुबेर शेख (8वी फ)

या उपक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अंबर्डेकर सर, निलेश जाधव सर, चेतन पाटील सर, सौ. सोनवणे मॅडम व मंडलिक मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श या स्पर्धेतून उभा राहिला असून, विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला यावेळी विशेष दाद मिळाली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.