Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना

Aug 28, 2025

पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न
मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरातील श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीची स्थापना मिरवणुक पालखीतून सकाळी मिरवणुकीची 29 वर्षाची परंपरा अखंडित ठेवत यंदाही सकाळी काढण्यात आली. मनमाड शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि❗ आम्ही परंपरा पाळतो.. आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो❗ हे ब्रीदवाक्य घेवून काम करणार्‍या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा ही सन 1997 पासून सलग 29 व्या वर्षी या स्थापना मिरवणुकीचे आयोजन सकाळी वेळेवर आयोजन करण्यात आलेल्या या मानाच्या पालखी मिरवणुकीचा आरंभ श्री निलमणी गणेश मंडळा चे विश्वस्त गोविंद रसाळ यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणार्‍या या मिरवणुकीत मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होतेे. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मनमाड शहरात श्री निलमणीच्या पालखी स्थापना मिरवणुकीचा शुभारंभ झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुकां निघून स्थापना करण्यात येते. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिंनीद्वारे औक्षण करण्यात आले. मिरवणुकीमध्ये खडी साखरेचा/मोदकाचा महाप्रसाद सर्व भाविकांना मिरवणुकीत वाटण्यात आला. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात श्री गणेश भक्त सौ. व श्री.भरत छाबडा यांच्या हस्ते पार्थीव मुर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. या स्थापना मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष, किशोर गुजराथी, सचिव नितिन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ प्रज्ञेश खांदाट, नारायणफुलवाणी, भिकाजी कुलकर्णी,आदी सह क्रांती आव्हाड संदीप सिनकर, रोहित कुलकर्णी, अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे,सतीश शेकदार ,, सौरभ मुनोत, प्रतिक पांगुळ, अक्षय छाबडा, , किशोर आव्हाड, दिपक शिंदे नीलकंठ त्रिभुवन, अनंता कुळकर्णी, मनोज छाबडा चंद्रकांत परब, किरण त्रिभुवन राजाभाऊ गुप्ता यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. या मिरवणुकीत श्री मोरया वाद्यवृंद पारंपारिक पध्दतीने श्री निलमणी गणेश च्या पालखी सन्मुख वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. दहा दिवस निलमणी गणेश मंदीरात दररोज सकाळी ठीक 06 वाजता महाअभिषेक /रात्री ठीक 08 वाजता महाआरती सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर ट्रस्ट तर्फे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सलग 09 वर्षी शिल्लक औषध संकलन उपक्रम या उत्सव काळात राबविण्यात येणार आहे पालखी मिरवणुकीचे नियोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केले.तर मनमाड शहर पोलिस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शन मध्ये पालखी मिरवणुकी दरम्यान चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता सकाळी निघालेल्या या पालखी मिरवणुकीत दर्शना साठी गणेश भक्तांचा मोठा उत्साह दिसला.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]