Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

Sep 14, 2025

मनमाड –
BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 15 वर्षातील संघाची निवड चाचणी पार पडली.
या निवड प्रक्रियेत मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा संघात निवड निश्चित झाली.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने सप्टेंबर महिन्यात शिरपुर जि. धुळे येथे खेळवले जाणार असुन हे सर्व खेळाडु जिल्हास्तरीय सामने खेळतील. मनमाडच्या या नवोदित महिला खेळाडु महाराष्ट्र अंडर 15 संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन उच्चस्तरीय स्पर्धेत करणार आहेत.
मनमाडच्या खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची 15 वर्षातील महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिली जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे सराव करत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव युवराज पाटिल सर व मनमाड गुरुद्वारा येथील जथेदार बाबा रणजित सिंग जी तसेच श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदेजी व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर दक्ष पाटिल, रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले.

या सर्व खेळाडुंना पुढिल जिल्हास्तरीय सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]