मनमाड – शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन को ऑप बँकेस महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन मुबंई यांच्यामार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. . फेडरेशन कडून सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना त्याच्या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार प्रगती बँकेच्या सर्व आर्थिक निकषाची व केलेल्या उत्कृष्ट कामाकजाचा विचार करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.सदर पुरस्कार 101 ते 300 कोटी ठेवी असलेल्या बँकेच्या वर्गवारीत देण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार फेडरेशन च्या दि 13/09/2025 रोजी नासिक येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री ज्योतिद्रजी मेहता यांचे शुभ हस्ते प्रधान करण्यात आला. बँकेतर्फे सदर पुरस्कार बँकेचे उपाध्यक्ष श्री कल्याणचंदजी ललवाणी, मा. कार्यकारी संचालक श्री पोपटशेट सुराणा जेष्ठ सचालक श्री सुभाषकाका संकलेचा यांनी स्विकारला. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकरी अधिकारी श्री किरण गोरे, वरिष्ठ व्यवस्थापक श्री पी डी ओढेकर सॊ, श्री अनिस शेख हे उपस्थिती होते.
बँकेचा या यशा बद्दल महाराष्ट्र राज्य अर्बन बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री अजयजी ब्रम्हेचा यांनी तसेच समाजातील विविध स्तरातील मान्यवराकडून प्रगती बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.