मनमाड : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात मार्गदर्शन करणे हे जितके आवश्यक आहे तितकेच घरी पालकांनी त्यांना योग्य वातावरण देणेही महत्त्वाचे आहे शिक्षण ही फक्त शाळा किंवा महाविद्यालयाची जबाबदारी नसून ती पालक आणि शिक्षक यांची संयुक्त जबाबदारी आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण व्ही.पाटील यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे शिक्षक पालक सभेत ते बोलत होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी पालकांना उद्देशून पुढे म्हटले की, आजच्या या चर्चेतून आपल्याला आपल्या मुलाच्या प्रगतीची दिशा समजेल आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाय शोधता येतील आपल्या सूचनांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. आपल्या सहकार्याने मुलांमध्ये असलेली सुप्त प्रतिभा विकसित करून त्यांना सक्षम जबाबदार आणि आदर्श नागरिक बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे यात आपले सहकार्य निश्चित मिळणारच आहे. असा विश्वास प्राचार्य डॉ. अरुण व्ही. पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रम, शिस्त व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. कु.भारती काकळीज, कु. तन्वी निकम, कु. दुर्गा साबळे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. शिक्षक पालक सभेत श्री विद्याधर वाघ, श्री शिवाजी काजीकर, श्री कल्पेश बेदमूथा या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रतिनिधिक स्वरूपात शिक्षकांमधून प्रा. अनिल शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बारावी विज्ञान शाखेची कु. गौरी मार्कंड या विद्यार्थिनीने शिक्षक पालक सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा विठ्ठल फंड, प्रा दिलीप कातकडे, प्रा आय. एम खान, प्रा एस डी देसले, प्रा एस आर पानपाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक पालक समितीचे चेअरमन प्रा. उज्वल बच्छाव तर सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल सातपुते यांनी केले.

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...