Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शाळा विकास व भविष्य नियोजनासाठी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडमध्ये नवी समिती स्थापन

Sep 26, 2025

 

 

मनमाड — श्री. गुरु गोबिंद सिंग हायस्कूल , मनमाड येथे शैक्षणिक प्रगती व दीर्घकालीन विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगती व भविष्यासाठी “शाळा विकास व नियोजन समिती” ची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.

मनमाड गुरुद्वारा प्रबंधक जतेदार बाबा रणजित सिंगजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये दिल्ली , मुंबई , नाशिक , कोपरगाव , संगमनेर , मालेगाव व मनमाड येथील 17 सदस्यांची नेमणुक करण्यात आली. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तसेच व्यावसायीक व समाजकार्य क्षेत्रातील विविध प्रतिष्ठित मान्यवरांचे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि काही शिक्षणतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

> “ही समिती म्हणजे केवळ आजचं नाही, तर उद्याचं शाळा घडवण्याचं एक पाऊल आहे,” असं उद्घाटनप्रसंगी शाळेचे प्रशासक श्री. सुखदेव सिंगजी यांनी सांगितलं.

समितीचे मुख्य उद्दिष्टे:

* शाळेची इमारत, वर्गखोल्या व सुविधा यांचे आधुनिकीकरण करणे
* अभ्यासक्रमात नावीन्य, डिजिटल साक्षरता व जीवनकौशल्ये समाविष्ट करणे
* विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि पाठिंबा प्रणाली बळकट करणे
* पालक, माजी विद्यार्थी व स्थानिक समुदाय यांच्याशी संवाद वाढवणे
* दीर्घकालीन शाळा विस्तार व नवीन उपक्रमांची आखणी
* शाळा सीबीएसई बोर्ड सुरु करण्याबाबत.
* नर्सिंग काॅलेज व Skill Development Courses सुरु करण्याबाबत.
* विविध खेळांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधां तसेच आवश्यक तश्या मैदानांची विकास व निर्माण करणे.
*

समिती दर महिन्याला बैठक घेणार असून, पहिला अहवाल डिसेंबर २०२५ पर्यंत सादर केला जाण्याची शक्यता आहे.

यासोबतच, पालक व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म व खुले चर्चासत्र आयोजित केली जातील.

श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडची ही पुढची पायरी शैक्षणिकदृष्ट्या एक आदर्श निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]