loader image

चांदोरे येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम

Oct 5, 2025

नांदगाव मारूती जगधने (ता.३ ऑक्टोबर २०२५):
वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव एच. बी. कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदोरे येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र वनविभाग नाशिक पूर्व विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था शाखा नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बिबट्या आणि मानव सहजीवन, स्वसंरक्षण उपाययोजना, वन्यजीव बचाव मार्गदर्शन तसेच शून्य सर्पदंश अभियान याबाबत माहिती देण्यात आली.

वन परिमंडळ अधिकारी एम. एम. राठोड (न्यायडोंगरी) यांनी आपल्या भागात वाढलेल्या बिबट्यांच्या उपस्थितीबाबत जागरूकता निर्माण केली. बिबट्यांपासून स्वतःचा तसेच पाळीव जनावरांचा बचाव कसा करावा आणि मानव–बिबट संघर्ष कसा टाळता येईल याबाबत उपाययोजना सांगितल्या.

वन्यजीव संरक्षण संस्था नांदगाव शाखेचे अध्यक्ष सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व मंगेश आहेर यांनी तालुक्यात आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांबाबत तसेच तरस, कोल्हा, लांडगा, उदमांजर, निलगाय, बिबट आदी वन्यप्राण्यांची सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी वनरक्षक आर. बी. शिंदे (परधडी), एस. आर. सोनवणे (न्यायडोंगरी), व्ही. बी. बलसाने, आर. के. महाजन, तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजाराम यशवंत निकम व शिक्षक साहेबराव तुकाराम वाडीले, निंबाजी संपत चव्हाण, नेहमीचंद बाबू चव्हाण, विजय बळीराम जाधव, निहाल चागोराव बिसेन आदी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जाणीव निर्माण होऊन मानव–वन्यजीव सहअस्तित्वाचा संदेश पोहोचल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.