loader image

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड

Nov 8, 2025


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुले मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड येथे करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्यातील नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर धाराशिव व क्रीडा प्रबोधिनी या नऊ विभागातील ३००उत्कृष्ट खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत

१७ व १९ वर्षा आतील मुले व मुलींच्या प्रत्येकी आठ वजनी गटात स्पर्धक सहभागी होत असून या स्पर्धेतूनच शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर होणार आहे

१७ वर्षाआतील मुले व मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धा इटानगर अरुणाचल प्रदेश येथे तर १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे

स्पर्धेचे उद्घाटन १०.११.२०२५ सोमवार संध्याकाळी ४ वाजता गुरुद्वाराचे बाबा रणजितसिंग जी फरहान दादा खान आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील क्रीडा अधिकारी अविनाश टीळे सर्वेश देशमुख संजय त्रिभुवन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत

स्पर्धेला मनमाड येथील सुप्रसिद्ध गुरुद्वारा चे बाबा रणजितसिंगजी नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे सौ अंजुमताई कांदे फरहानदादा खान राजेंद्र पगारे योगेश पाटील मयूर बोरसे साईनाथ गिडगे यांचे सहकार्य लाभले आहे


अजून बातम्या वाचा..

.