मनमाड :- मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातला हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे
मनमाड शहरात व परिसरात मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने तरुण कार्यरत आहेत या सर्व तरुणांनी एकत्र येत मनमाड सेल्स असोसिएशनची स्थापना केली आहे सगळे लॉन्स येथे झालेल्या या बैठकीमध्ये बोलताना संस्थापक गणेश केदारे नवनियुक्त अध्यक्ष नाना निकम यांनी युनियनचे महत्त्व सांगितले संघटन शक्ती ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आवश्यक असून मार्केटिंग व सेल्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अतिशय बिकट असे हे क्षेत्र असून सगळ्यांनी एकत्र राहून संघटन शक्तीच्या माध्यमातून आपले प्रश्न व अडचणी सोडून घ्याव्यात असे आवाहन गणेश केदारे व नाना निकम यांनी समजून सांगितले मनमाड सेल्समन युनियनच्या कार्यकारणीची घोषणा करत कार्यकारणीची घोषणा करत काही मुद्दे उपस्थित करून समजून सांगितले.
यावेळी मनमाड सेन्स युनियनच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष तथा संघटक गणेश केदारे,सागर गवळी,गणेश नवले यांनी सर्व मताने हता उंचावून अध्यक्ष म्हणून नाना निकम यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. कार्याध्यक्षपदी सचिन अहिरे, रमीज बेग व हर्षवर्धन डोखे यांची सहकार्याध्यक्षपदी शैलेश भोसले, उपाध्यक्षपदी गणेश नवले,संतोष वाघ, सचिव पदी सचिन पगारे, सहसचिव पदी भाऊसाहेब गुजर, खजिनदारपदी अमोल पद्मने, सहखजिनदारपदी प्रशांत मोरे, सह संघटक सागर गवळी मार्गदर्शक म्हणून भूपेंद्र भावसार सचिन भोळे किरण भालके मनोज बागुल प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्रावण वाघ व दीपक घोडके याप्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.
या युनियनच्या माध्यमातून पहिल्यांदाच मनमाड सर्व परिसरातील मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रामध्ये करत असलेले युवक एका झेंड्याखाली एकवटले आहेत नूतन कार्यकारणीचे सर्वत्र अभि नंदन केले जात आहे.
फोटो.
मनमाड शहरातील सगळे लॉन्स येथे उपस्थित सर्व पदाधिकारी व सभासद.










