दिनांक :12/11/2025
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था जि.प. नाशिक, इन्स्पायर अवॉर्ड टीम व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन 2024-25 नुकतेच अंजनेरी येथील ब्रम्हा व्हॅलीमध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनात 459 शाळांनी सहभाग नोंदविलेला होता. त्यापैकी 41 शाळांच्या विज्ञान प्रतिकृतींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आलेली आहे. या निवड झालेल्या प्रतिकृतींमध्ये कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेजची इयत्ता 9 वी ची विद्यार्थिंनी कु. रूद्राणी विनोद देशमानकर हिने तयार केलेल्या ‘नॅचरल बायोप्लास्टिक’ या प्रयोगाची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. आज संपूर्ण जगासमोर प्लास्टीकची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. दैंनदिन व्यवहारात वापरले जाणारे पारंपारीक प्लास्टिक हे केमिकलयुक्त व अत्यंत हानीकारक असून कॅन्सरसारखे भयानक आजार पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत. व हे पारंपारीक प्लास्टीक पर्यावरणालादेखील मारक आहेत. या पारंपारीक प्लास्टीकला रूद्राणी देशमानकर हिने आपल्या प्रयोगातून बायोप्लास्टीकचा उत्तम पर्याय शोधलेला आहे. सदरचे बायोप्लास्टीक मक्याचे पीठ व व्हेज जिलेटीन यांच्या वापरातून बनवता येते. तिच्या या राज्यस्तरीय निवडीबद्दल मा. माध्यमिक शिक्षणाधिकारी जिप नाशिक श्री. प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते मार्गदर्शक शिक्षिका सौ. संगिता कदम-देसले व कु. रूद्राणी विनोद देशमानकर यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
रूद्राणीच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कु. रूद्राणीला शाळेच्या सौ. संगिता कदम-देसले व श्री. प्रविण आहेर यांचे मार्गदर्शन लाभले











