Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Nov 27, 2025

**
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शरद वाघ हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात ” भारतीय संविधान हे जगातील एक अद्वितीय संविधान असून संविधानाची नैतिक मूल्ये जपणे काळाची गरज आहे” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, ” लोकशाही सशक्त करण्यासाठी संविधानिक मूल्यांना सर्वोच्च स्थान देण्याची आवश्यकता आहे” असे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कुलसचिव श्री समाधान केदारे हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी तसेच आभार प्रदर्शन प्रा. विजया सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एनसीसीचे कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व ग्रंथालय विभागातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]