Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न

Nov 29, 2025

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फा.माल्कम, शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्सना,शाळेचे पर्यवेक्षक अनिल निकाळे सर उपस्थित होते. कुमारी भाविका शिरसाट हीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन कुमारी सुप्रिया सानप हिने केले. कुमारी आरती अहिरे हिने संविधान निर्मितीची प्रक्रिया आपल्या भाषणातून सांगितली तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व विशद करुन शालेय ग्रंथालयात असणाऱ्या संविधानाच्या प्रतीचे वाचन विद्यार्थ्यांना करण्याचे आवाहनही केले. कुमारी सोनाली हाके या विद्यार्थिनीने संविधानावर आधारित कविता सादर केली तर आभार प्रदर्शन कुमारी सुप्रिया सानप हिने केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]