मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फा.माल्कम, शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्सना,शाळेचे पर्यवेक्षक अनिल निकाळे सर उपस्थित होते. कुमारी भाविका शिरसाट हीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन कुमारी सुप्रिया सानप हिने केले. कुमारी आरती अहिरे हिने संविधान निर्मितीची प्रक्रिया आपल्या भाषणातून सांगितली तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व विशद करुन शालेय ग्रंथालयात असणाऱ्या संविधानाच्या प्रतीचे वाचन विद्यार्थ्यांना करण्याचे आवाहनही केले. कुमारी सोनाली हाके या विद्यार्थिनीने संविधानावर आधारित कविता सादर केली तर आभार प्रदर्शन कुमारी सुप्रिया सानप हिने केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले.
के.आर. टी शाळेत “लेट्स कॉल अवर परेंट्स” उपक्रम
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. के.जी. विभागामध्ये आज दिनांक 12/12/2023 रोजी कवी रवींद्रनाथ...









