Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तीन सुवर्ण व तीन रौप्य पदकासह मनमाडच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

Dec 26, 2025

कृष्णा व्यवहारे ने पटकावला यूथ मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
तळेगाव दाभाडे पुणे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय यूथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले
कृष्णा संजय व्यवहारे याने ६५ किलो वजनी गटात १०८ किलो स्न्याच १३८ किलो क्लीन जर्क २४६ वजन उचलून यूथ व जूनियर मूले या दोन्ही गटात दोन सुवर्णपदके मिळवित सर्वांची मने जिंकली
साहिल यादवराव जाधव याने ७९ किलो वजनी गटात १२२ किलो स्न्याच १५० किलो क्लीन जर्क २७२ किलो वजन उचलत यूथ मुलांमध्ये सुवर्णपदक जूनियर व सीनियर मुलांमध्ये रौप्यपदक पटकावले
जयराज राजेश परदेशी याने सीनियर मुलांमध्ये ९४ किलो वजनी गटात १३८ किलो स्न्याच १७२ किलो क्लीन जर्क ३१० किलो वजन उचलत चुरशीच्या लढतीत रौप्य पदक पटकावले
आयुष देवगीर अवधुत आव्हाड कृष्णा शिंदे साहिल जाधव ध्रुव पवार आलेख पगारे यांनी उत्तम कामगिरी केली
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले

अजून बातम्या वाचा..

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलि, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड – लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा 28 वे वर्ष

मनमाड - हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची...

read more
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]