loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव.

Dec 26, 2025

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजीयानी, यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू विद्यार्थ्यांकडून क्रीडा ज्योत दौड करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या सचिव हज्जन सायराबानो मो.सलीम गाजीयानी, सदस्य अब्दुल करीम मो.सलीम गाजीयानी, सादीकभाई पठाण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी यांनी उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर शब्बीर अहमद, शेख आरीफ कासम यांनी स्वागत केले. या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, फुटबॉल,कबड्डी, संगित खुर्ची, बॉल रेस, आटा गोली, रिंग रेस,रिले रेस,बॉल पासिंग द पास, लिंबु चमचा, थैला रेस, लंगडी, खो-खो, डॉच बॉल, बलून रेस, रस्सा खेच, थ्रो बॉल, बॉल पासिंग, स्लो सायकल, रिले रेस, अशा विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी रस्सा खेच, क्रिकेट, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. तसेच खरी कमाई अंतर्गत विदयार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची दुकाने लावून त्यांचा अनुभव घेतला.

क्रीडा स्पर्धेतील व मेहंदी, रांगोळी,चित्रकला स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
.