loader image
[ays_poll id=7]

“मनमाड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न” 

Dec 26, 2025


 

आज दिनांक 26/12/2025 मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे अलीकडील “रसायनशास्त्रातील संशोधनाच्या संधी” या विषयावर आंतरराष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारदरम्यान रसायनशास्त्र क्षेत्रातील नवीन संशोधन आणि संशोधनाच्या संधी याबद्दल मार्गदर्शनपर चर्चा झाली. सेमिनारचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या कार्यक्रमाचे औचित्य सांगत रसायनशास्त्राच्या विकासातील अद्ययावत तंत्रे समजून घेण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. पहिल्या सत्राचे मुख्य वक्ते डॉ. पंकज कोइनकर( टोकुशीमा विद्यापीठ, जपान) होते, ज्यांनी रसायनशास्त्रातील नवीन साहित्य आणि तंत्रज्ञानावर विस्तृत माहिती दिली. दुसऱ्या सत्राचे मुख्य वक्ते डॉ. उमेश तुपे यांनी संशोधन पद्धती आणि अनुप्रयोगांवर प्रकाश टाकला.

उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एस. देसले यांनी सहभागींचे स्वागत करून सेमिनारची उद्दिष्टे स्पष्ट केली. आयोजन समितीत डॉ. ए. व्ही. गजभिये, डॉ. आर. एस. शिंदे, प्रा. ए. आर. बुकाणे, प्रा. एम. सी. नागरे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी समारोपापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सदर सेमिनारसाठी महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे कार्यालयीन अधीक्षक श्री एल. के. निकम शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला व सहकार्य केले. मनमाड व परिसरातील पदवी व पदव्युत्तर विभागातील एकूण 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सदर आंतरराष्ट्रीय सेमिनारसाठी सहभाग नोंदवला. हे आंतरराष्ट्रीय सेमिनार विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम शिक्षणाप्रद अनुभव ठरला. रसायनशास्त्र क्षेत्रातील नवीन दिशा आणि संधींबद्दल माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला. महाविद्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम उच्च दर्जाचा शैक्षणिक आणि संशोधन वातावरण निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.