loader image
[ays_poll id=7]

मेघा आहेरची ‘सुवर्ण’ भरारी

Jan 12, 2026

भोपाळ येथे सुरू असलेल्या साउथ वेस्ट आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळा व वरिष्ठ महाविद्यालय वागदर्डी महाविद्यालयाच्या मेघा संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत ६८ किलो स्न्याच व ८८ किलो क्लीन जर्क १५६ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले ४८ किलो वजनी गटात विविध विद्यापीठातील ५२ खेळाडूंचा विक्रमी सहभाग नोंदविला.

मेघा संतोष आहेर हिची चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील, मोहन गायकवाड, डॉ.सुनील बागरेचा, प्रा.दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी.जे.दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

“संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना” अंतर्गत नांदगाव तालुक्यासाठी ऊस तोड पालकांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह मंजूर

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव तालुक्यातील ऊस तोड कामगार पालकांच्या...

read more
श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

श्री गणेश ज्वेलर्सचे बुधवारी उद्घाटन – सिने अभिनेत्री गिरिजा प्रभु प्रमुख आकर्षण

सुमारे दोन दशकांपासून मनमाड शहर आणि परिसरातील ग्राहकांसाठी सोने,चांदीच्या दागिन्यांच्या विविध...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

जि.प.प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नांदगांव : मारुती जगधने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष...

read more
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून….येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये निधी वितरित

नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ...

read more
.