Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026

(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

“जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा” हे भावस्पर्शी गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले. त्यांना संगीतसाथ कल्पना आहिरे यांनी दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा विचार या मातीत रुजवला. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. त्या सामान्य जनतेच्या समस्या स्वतः न्यायनिवाडा करून सोडवत असत. त्या स्त्रीशक्तीचे प्रतीक व सक्षम मार्गदर्शक होत्या, असे मनोगत उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी व्यक्त केले.

उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की, भारत सरकारने १९८४ पासून १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रप्रेमाचा जगभर प्रसार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली असून “शिवभावे जीवसेवा” हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती संकलन नसून माणूस घडविणे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच “जेवढा मोठा संघर्ष, तेवढाच विजय भव्य” हा मोलाचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजमाता जिजाऊंचे आयुष्य केवळ इतिहास नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम या सत्त्वगुणांचे संस्कार त्यांनी छत्रपती शिवरायांवर केले, असे त्यांनी नमूद केले.

पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडताना “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” तसेच “जीवनात जोखीम पत्करा; जिंकलात तर नेतृत्व करा, हारलात तर इतरांना मार्ग दाखवा” हे विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]