loader image
[ays_poll id=7]

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Jan 13, 2026

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस मनमाड नगरपालिकेच्या महिला अधिकारी, उपमुख्याधिकारी सोफिया बागल व सहाय्यक नगररचनाकार रागिनी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेचे अधिकारी किरण आहेर व रचनाकार रागिनी चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले.

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांसमवेतच छत्रपती संभाजी महाराजांना देखील घडविण्याचे काम केले. जिजाऊंचे बुद्धीचातुर्य, युद्ध कौशल्य, समयसूचकता, धैर्य, निडरता व इतर अनेक गुणांचा दाखला त्यांच्या जीवनकार्यातून पाहायला मिळतो, आज देखील जीवनात अनेक बिकट प्रसंग येत असतात परंतु जिजाऊंच्या जीवनाचा अनुभव पाठीशी घेऊन मार्गक्रमण केल्यास कोणत्याही संकटास सामोरे जाणे व त्याचा पराभव करणे सोपे होऊ शकते, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी मंचचे मार्गदर्शक हाजी रफिक बाबूजी, हाजी शफी मुसा, एकरा गर्ल्स स्कूलचे संचालक एम.सलीम अहमद, जावेद शेख, रामदास पगारे, किरण पाटील, विकास गायकवाड, सद्दाम आत्तार, मतीन मन्सुरी, विलास कातकडे, सुनील दराडे, उमेश सोनवणे, आशा चव्हाण, मोहम्मद बोहरी, शितल जाधव, गोरख झाल्टे, शकूर शेख, अमोल बागुल, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संयोजन मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केले, आभार प्रदर्शन सद्दाम आतार यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची  निवड

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नांदगाव विधानसभा मीडिया प्रमुखपदी सतीश परदेशी यांची निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या प्रति असलेली निष्ठा सामाजिक कार्याची बांधिलकी व उत्तम...

read more
बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

बघा व्हिडिओ – प्रभु श्री रामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड याच्या पुतळ्याचे मनमाड शिवसेनेतर्फे दहन

सकल हिंदु समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या राजकीय...

read more
नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक मध्ये पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय युवा महोत्सव – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड ही अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची...

read more
शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आमदार सुहास आण्णा कांदे, सौ.अंजूमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे स्त्री...

read more
क्रांतिज्योती फुलेंची प्रतिकृती फुलांवर!कल्पना अन् कलेचा सुंदर आविष्कार देव हिरेंकडून सादर.

क्रांतिज्योती फुलेंची प्रतिकृती फुलांवर!कल्पना अन् कलेचा सुंदर आविष्कार देव हिरेंकडून सादर.

काट्यांमधून मार्ग काढत गुलाबाचा सुगंध जसा परिसर दरवळून टाकतो अगदी तसाच काट्यांचा संघर्ष करत फुले...

read more
.