Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अमृत नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बेदमूथा तर उपाध्यक्षपदी बरडिया

Jan 14, 2026

मनमाड शहरातील अमृत नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. योगेश उगलमुगले (मुख्य लिपिक, नांदगाव) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत मनमाड शहरातील प्रसिद्ध व्यापारी दिलीप घेवरंचद बेदमुथा यांची अध्यक्षपदी तर राजेंद्र भेरुलाल बरडीया यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच मानद सचिवपदी श्री. संजय झुंबरलाल चोपडा यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा अमृत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन अजित सुराणा, माजी चेअरमन कांतीलाल लुणावत, डॉ. सुनील बागरेचा, संचालिका सौ. कमलबाई गांधी, सौ. सुनीता गुंदेचा, संचालक शांताराम आहिरे, कैलास पवार, तसेच माजी चेअरमन शांतीलाल गांधी,  के. के. गुंदेचा, संस्थेचे व्यवस्थापक सुधीर गांगुर्डे व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]