loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न

Jan 17, 2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, उप प्राचार्य डॉ. बी.एस देसले यांच्या मार्गदर्शनात मनमाड महाविद्यालयात संपन्न झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रतिभा कोठुळे, सुशांत रणशूर, अतुल देवरे, पूजा पगार, पुनम धांद्रे, कुलसचिव समाधान केदारे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.डी.व्ही. सोनवणे, डॉ. संजय चिंचोले, प्रा.समाधान सुखदेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

प्रतिभा कोठुळे यांनी आज होणारा निसर्गाचा ऱ्हास व त्यावरच्या उपायोजना, राह फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जैवविविधता उपक्रमांविषयी माहिती तसेच राह फाउंडेशनतर्फे निमोण येथे सुरू असलेल्या वृक्षारोपण, जैवविविधता पार्क याविषयी मार्गदर्शन त्यांनी केले.

ए आर इ ए एस फाउंडेशनचे सुशांत रणशूर यांनी सापांसोबत सहअस्तित्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सापांकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये भरलेली अंधश्रद्धा, साप ओळखण्याची पद्धत, सर्पदंश व त्यापासून च्या उपायोजना यांची प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. रूपाली घुगे, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ पवनसिंग परदेशी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार डॉ. आरती छाजेड यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रासयो कार्यक्रमाधिकारी डॉ पवन सिंग परदेशी, डॉ.आरती छाजेड यांच्यासह एन एस एस स्वयंसेवक, स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
.