loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

Jan 27, 2026


मनमाड :
पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संदीप देशपांडे, जहूर खान, नरहरी उंबरे, सोमनाथ घोंगाणे, प्रा. सुरेश नारायणे या जेष्ठ पत्रकारांना चौथास्तंभ जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाचा हा सोहळा गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता पल्लवी मंगल कार्यालय, मनमाड येथे होणार आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संदीप देशपांडे, जहूर खान, नरहरी उंबरे, सोमनाथ घोंगाणे आणि प्रा. सुरेश नारायणे यांना यंदाचा चौथास्तंभ जीवनगौरव पुरस्कार पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील गुणवंत पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

साप्ताहिक मनमाड ठिणगीचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ पत्रकार (स्व.) प्रकाश गोयल  यांच्या स्मरणार्थ गोयल परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘चौथास्तंभ जीवनगौरव पुरस्कारासाठी’ यंदा वरील पाचही ज्येष्ठ पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास NDTV मराठीचे वृत्तनिवेदक तन्मय टिल्लू यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक, तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, पत्रकारितेचे बदलते स्वरूप व पत्रकारितेपुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे, तालुकाध्यक्ष संदीप जेजुरकर आणि सरचिटणीस निलेश वाघ यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.