loader image
[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्यस्पर्धेचे आयोजन.

Feb 5, 2026

▪️मनमाड (प्रतिनिधी) ता. ५ :
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी तसेच त्यांच्या सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनमाड साहित्य संघाच्या वतीने शहरात काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मनमाड शहरातील तब्बल १४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सध्याच्या मोबाईलप्रधान युगात मुलांची लेखनाची सवय कमी होत चालली असून त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्ती व भाषिक अभिव्यक्तीवर होत असल्याचे जाणवत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लेखनसंस्कार रुजावेत, काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढावी या हेतूने साहित्य संघाने हा नवा शहर पातळीवरील शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम हाती घेतला आहे.

या स्पर्धेसाठी इयत्ता ७ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना स्वरचित व स्वलिखित कविता सादर करावयाच्या आहेत. विविध शाळांकडून प्राप्त होणाऱ्या कवितांमधून उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या बालकवींची निवड करण्यात येवून निवड झालेल्या कवितांचे सादरीकरण २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

त्याच दिवशी उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना संघाचे अध्यक्ष प्राचार्य सदाशिव सुतार, कार्यवाह अमोल खरे, सचिव जनार्दन देवरे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सुर्वे, कोषाध्यक्ष विकास काकडे, संदीप देशपांडे, डॉ जे वाय इंगळे, प्रदीप गुजराथी, शांताराम वाघ, अशोक परदेशी, नरेश गुजराथी, मंदोदरी पाटील, प्रिया परदेशी राजू लहिरे, डी. डी. पाटील, हेमंत वाले,  सुरेंद्र भुजंग, डी. टी. पवार आदींनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी ओढ निर्माण होऊन भविष्यात कवी, लेखक आणि विचारवंत घडण्यास मदत होईल, असा विश्वास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे मनमाड साहित्य संघाने कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
.