loader image
[ays_poll id=7]

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

Feb 7, 2026

मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस कॅम्पसतर्फे इयत्ता १० वी व १२ वी (२०२५-२६) च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन, प्रेरणा आणि संस्कार यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. देवकी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र राजपूत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना यशाची खरी व्याख्या समजावून सांगत ध्येय, जिद्द, शिस्त आणि स्मार्ट वर्क या चार सूत्रांवर भर दिला. सोशल मीडियाचा अति वापर टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसल्याचा संदेश त्यांनी दिला. सिद्धी क्लासेसमधील विद्यार्थ्यांमधील शिस्त, आत्मविश्वास आणि अभ्यासू वृत्तीचे त्यांनी विशेष कौतुक करत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
प्रभाग क्रमांक ५ मधील समाजसेवक वाल्मीक आप्पा आंधळे यांनी क्लासेसमधील प्राध्यापक, शिक्षक आणि संचालकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका कमलताई वाल्मीक आप्पा आंधळे यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.
क्लासेसच्या संचालिका प्रा. भाग्यश्री दराडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश देत त्यांना शुभेच्छा दिल्या. बारावीच्या विद्यार्थिनी हिमांगी मूलचंदानी व सई सोमासे यांनी प्रभावी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. कोमल आव्हाड व स्नेहल पाटील यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर वेदा शेवाळे व दीक्षा इंगळे यांच्या शेरोशायरीने वातावरण प्रसन्न झाले. ऋतुजा तुपे व प्रियांका शेळके यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी घोडके व वेदांत जाधव यांनी प्रभावीपणे केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अरुण सोनवणे, प्रा. मयूर आहेर, प्रा. राहुल गुंडगळ तसेच श्रद्धा मॅडम, उबाळे मॅडम, गांगुर्डे मॅडम व सरस्वते मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.
शेवटी क्लासेसचे संचालक डॉ. भागवत दराडे यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. प्रेरणा, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांची परंपरा जपणाऱ्या सिद्धी क्लासेस कॅम्पसचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी नव्या उमेदीचा आणि आत्मविश्वासाचा स्रोत ठरला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.