loader image
[ays_poll id=7]

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

Feb 24, 2026

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ” पुरस्कार कर्जत येथे नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला.

पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे, उपाध्यक्ष नरहरी उंबरे, सरचिटणीस निलेश वाघ, कार्याध्यक्ष उपाली परदेशी, संघटक अशोक बिदरी व सदस्य गणेश केदारे उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष अमोल खरे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या सामूहिक कार्याचा गौरव आहे.

कर्जत येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी पत्रकारांनी शोध पत्रकारिता अखंड चालू ठेवण्याचे आवाहन केले. “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पत्रकारांनी आपली भूमिका अधिक सक्षम करावी. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे योगदान भरीव असून मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचे प्रयत्न अफाट आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

यंदा “पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ” हा पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला, तर “वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ” पुरस्कार नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे, वृत्तनिवेदक विशाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे पुढील अधिवेशन एप्रिल महिन्यात उदगीर तालुक्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.