loader image
[ays_poll id=7]

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Feb 24, 2026

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली. काहींनी पाटी-पावडे घेऊन साचलेला कचरा व पालापाचोळा हटविला. या मोहिमेमुळे उद्यान परिसर स्वच्छ व सुशोभित दिसू लागला.

यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी संत कैकाडी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी मनमाड शहरात पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करत संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या आदर्शाचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. “आपले घर, अंगण, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश शेकदार, निलेश वाघ, अशोक बिदरी, गणेश केदारे, रामदास सोनवणे, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, उपनगराध्यक्ष मुकुंद एळीजे, नगरसेवक अमजद पठाण, बब्बू कुरेशी, गटनेते पिंटू शिरसाठ, सुनील हांडगे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.