loader image
[ays_poll id=7]

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

Feb 25, 2026

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजमध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरूवात सर्व संस्थापक-विश्वस्तांच्या हस्ते सरस्वती आणि रबिंद्रनाथ टागोरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कु. अमिता झाडे यांनी संस्थेच्या मागील २३ वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीचा आणि वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिका-यांनी संस्था आणि शाळेच्या स्थापनेसाठी केलेल्या कार्यातील योगदानाचे महत्व विषद करतांना त्यांच्या कामगिरीचे कौतूक केले. यानंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते सर्व संस्था पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला व ‘बोर्ड ऑफ ट्रस्टी’ या फलकाचे उद्घाटन अध्यक्ष श्री. मुकेश मिसर व संस्थाचालकांच्या हस्ते करण्यात आले.

संस्था वर्धापनदिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात इ. ६ वीची विद्यार्थिनी कु. श्रेया लहामगे हिने ‘आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा’ हे गीत सादर केले. केजी विभागाच्या चिमुकल्या बोधिका संसारे हिने भाषणातून आपले विचार मांडले. इ.६ वीच्या कु. समिक्षा आव्हाड या विद्यार्थिनीने आपल्या भाषणात ‘एकमेका साहय करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे संस्था व शाळेने प्रगती केल्याचे सांगितले. तसेच प्रवास म्हंटले की, अडथळे आलेच, पण सर्व अडथळयांना पार करून शाळेची अत्याधुनिक आणि सुसज्ज यंत्रणा उभारण्यामागे सर्व विश्वस्तांचा किती संघर्ष दडलेला आहे, तो आपण विसरता कामा नये व प्रत्येक विद्यार्थ्यांने आयुष्यात गुणवत्ता साकारून ही परतफेड करावी असे आवाहन केले.

शाळेचा ज्येष्ठ शिक्षक-शिक्षिकांनी सादर केलेल्या समुहनृत्यातील ‘जीना यहाँ, मरना यहां’ या गीतातून शाळेबद्दलची आस्था आणि निष्ठा व्यक्त करतांनाच गेल्या काही वर्षात संस्था आणि शाळेच्या परिवारातील ज्या सदस्यांना काळाने हिरावून नेले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यामुळे क्षणभर उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत पुढील वाटचाल करणे हेच आयुष्याचे खरे सूत्र असल्याचे ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हया गीतातून व्यक्त केले.

शाळेतील शिक्षक श्री. सचिन बिडवे यांनी ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे भावगीत सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले. सौ. अनिता शाकाव्दिपी यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून आई, मुलगी यांच्यातील विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत शाळेची भुमिका आणि विद्यार्थ्यांसह पालकांची जबाबदारी याबाबत एकमेकींशी होणारा संवाद आणि भावना व्यक्त केल्या तर सौ. संगिता कदम-देसले यांनी कवी श्याम यांची ‘झाड होणं सोप्पं नसतं’ ही कविता सादर केली. सौ. एस्तेर क्षिरसागर यांनी वेळोवेळी आलेल्या अडीअडचणीतून संस्थेने काढलेले मार्ग, उपाययोजना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ठेवलेली सहकार्याची भावना याबद्दल आपल्या मनोगतातून आभार मानले.

इयत्ता ७ वी च्या विद्यार्थिनींनी ‘किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार’ या नृत्यावर संस्था व शाळेचे कार्य समूहनृत्यातून सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. पियूष सपकाळे याने रबिंद्रनाथ टागोर यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र आपल्या रांगोळीतून साकारून उपस्थितांना स्तंभित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकेश मिसर यांनी संस्थेच्या २३ वर्षाच्या प्रवासातील चढ-उतार यांचा सुरेख आलेख मांडतांना सर्व विश्वस्तांनी त्यांच्या नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासामुळेच वाटचाल करणे सोपे झाल्याचे सांगितले. संस्थेच्या आणि शाळेच्या या यशामध्ये सर्व संस्थाचालक, शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य पालकांचा विश्वास लाभल्याचे समाधान वाटते. भविष्यातही शाळेच्या माध्यमातून दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे नमूद केले.

कार्यक्रमास संस्थेच्यावतीने श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर, श्री. ज्ञानेश्वर माळी, श्री. मनोज छाबडा आणि श्री. तुषार चौधरी हे उपस्थित होते.

समूहनृत्याचे दिग्दर्शन कु. भारती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. अमिता झाडे आणि सौ. रूपाली निंभोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे फलकलेखन श्री. राजेश सोनवणे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
.