Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

Feb 25, 2026

मनमाड – मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो ….! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…! हे ब्रीद वाक्य घेऊन आजपर्यंत अखंडीतपणे 30 वर्षे विविध उपक्रमांद्वारे धार्मिक व सामाजिक आरोग्य सेवाकार्य करणार्‍या मनमाड शहरात मानाचे स्थान असणार्‍या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे 2017 पासून यंदाही सलग नववे वर्षी भाद्रपद महा गणेशोत्सव 2025 मध्ये यंदा उत्सवाच्या 29 व्या वर्षानिमित्त गरीब रुग्णांसाठी शिल्लक औषध संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते. शहरातील नागरिकांना त्यांच्याकडे उपचारानंतर शिल्लक असणारी औषधे की ज्यांची मुदत वैधता (एक्सपायरी डेट) बाकी आहे. ती श्री निलमणी गणेश मंदीरात ठेवण्यात आलेल्या शिल्लक औषध संकलन पेटीमध्ये देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. मनमाड शहरातील व परिसरातील गणेश भक्तांनी व नागरिकांनी या आरोग्य सेवा उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ने या आरोग्य सेवा कार्यात मोठी भरारी घेत यंदा या शिल्लक औषध संकलन पेटीमध्ये सुमारे रुपये 109,000/- पेक्षा जास्त किंमतीची विक्रमी औषधे की ज्यांची मुदत वैधता शिल्लक आहे अशी संकलीत झाली. 2017 पासून आज पर्यंत नऊ वर्षात या उपक्रमा द्वारे ट्रस्ट तर्फे 3,25,000/- पेक्षा जास्त किमतीची औषधे संकलित करण्यात आली आहेत ट्रस्टतर्फे या औषधांचे विविध आजारानुसार वर्गीकरण करण्यात आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सेवा भारती (जनकल्याण समिती) नाशिक यांच्या मार्फत दुर्गम आदिवासी भागात गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधे उपलब्ध करुन दिली जातात म्हणून श्री निलमणी गणेश मंदीर ट्रस्टतर्फे यंदा ही सर्व रु.109,000/- पेक्षा किंमतीची विक्रमी संकलीत औषधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सेवा भारती (जनकल्याण समिती ) चे नाशिक विभागीय कार्यवाह अरविंद जोशी यांच्या कडे यांना ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितीन पांडे, उपाध्यक्ष शेखर पांगुळ , विश्‍वस्त गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी भिकाजी कुलकर्णी यांनी सूपूर्द केली श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे हा गरीब रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करुन देणारा शिल्लक औषध संकलन केंद्र उपक्रम अखंडित सुरु राहणार असून सोबतच श्री निलमणी ट्रस्ट तर्फे भविष्यात मोफत औषध बँक सुरु करण्याचा मानस आहे तसेच मनमाड शहरात गरीब रुग्णांन साठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करणार असल्याचे ट्रस्टचे सचिव नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले .सेवा भारती तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्प ची माहिती देत अरविंद जोशी यांनी ट्रस्ट चे आभार व्यक्त केले श्री निलमणी गणेश मंदीरातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ट्रस्टला अक्षय सानप,जितेंद्र पाटील, भीमराव बिडगर, आकाश वाघ,दीपक शिंदे, अभिषेक पितृभक्त,कल्पेश बेदमुथा राहुल लांबोळे, रवींद्र वास्कर,मच्छिन्द्र साळी, प्रकाश धामणस्कर आदी मान्यवरां सह ज्ञात अज्ञात गणेश भक्तांन चे अनमोल सहकार्य लाभले. हा गरीब रुग्णांसाठीचा शिल्लक औषध संकलन उपक्रम यापुढेही ट्रस्टतर्फे निरंतर वर्षभर राबविला जाणार असून नागरिकांनी व गणेशभक्तांनी या उपक्रमास असाच प्रतिसाद द्यावा असे नम्र आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त , किशोर गुजराथी ,नितीन पांडे शेखर पांगुळ, गोविंद रसाळ,प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी भिकाजी कुलकर्णी आदी विश्‍वस्त मंडळाने केले आहे. या कार्यक्रमास आदी सेवा भारती चे नाशिक जिल्हा सहसचिव कृष्णाजी वडे, सेवा भारती चे नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब धांडे भरत छाबडा मान्यवरांन सह गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट ने केले.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास...

read more
बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]