Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

Feb 26, 2026

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी आणि त्यांच्या सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनमाड साहित्य संघाच्या वतीने शहरात काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

सध्याच्या मोबाईलप्रधान युगात विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी होत चालल्याने त्यांच्या स्मरणशक्ती व भाषिक अभिव्यक्तीवर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लेखनसंस्कार रुजावेत, काव्यनिर्मितीची प्रेरणा मिळावी आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढावी या हेतूने साहित्य संघाने हा शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रम हाती घेतला आहे.

या स्पर्धेसाठी इयत्ता ७ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांकडून स्वरचित व स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. शहरातील ११ शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या कवितांमधून उत्कृष्ट काव्यलेखनाची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या कवितांचे सादरीकरण २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या सितालक्ष्मी सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट काव्यलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संघाचे अध्यक्ष प्राचार्य सदाशिव सुतार, सचिव जनार्दन देवरे,

कार्यवाह अमोल खरे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र सुर्वे, कोषाध्यक्ष विकास काकडे तसेच संदीप देशपांडे, डॉ. जे. वाय. इंगळे, प्रदीप गुजराथी, शांताराम वाघ, मंदोदरी पाटील, प्रिया निकुंभ-परदेशी, डी. डी. पाटील, हेमंत वाले, सुरेंद्र भुजंग आणि डी. टी. पवार यांनी दिली

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक...

read more
केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम  स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम स्वच्छता प्रेमी नागरिक, राबणारे सफाई कामगारच यशाचे खरे हीरो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  राज्यातील नागरिकांचे केले अभिनंदन, स्वच्छतेत सातत्य राखण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या स्वच्छ...

read more
गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]