loader image
[ays_poll id=7]

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

Feb 26, 2026

दि.२७ फेब्रुवारी २०२६

मराठी भाषा गौरव दिन

।। माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।।

मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर.(कुसुमाग्रज) यांचा आज जन्मदिन. हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दुसरे साहित्यिक. यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो.

ज्या भाषेने आम्हाला विचार करायला शिकवलं,लिहायला वाचायला शिकवलं,जगण्याची कला शिकवली. अशा माय मराठी चा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. चला मायबोली मराठीचा सन्मान व गौरव करूया,,,!!

मराठी आमचा कणा,,अन,,मराठी आमचा बाणा. मराठी जगूया,,रुजवूया,,सजवूया,,फुलवूया,,व जपूया,,!

अभिमानाने मराठी बोलूया,,,,,,!

मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!

(फलक रेखाटन- देव हिरे. कलाशिक्षक,नू.मा.वि.भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

शिंगवे मेसनखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सकाराम कडनोर यांची निवड

शिंगवे मेसनखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सकाराम कडनोर यांची निवड

चांदवड तालुक्यातील शिंगवे मेसनखेडे खुर्द व दहेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या...

read more
जल जीवन मिशन अंतर्गत ७८ खेडी  पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता :आमदार कांदे यांच्या प्रयत्नांना यश

जल जीवन मिशन अंतर्गत ७८ खेडी पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता :आमदार कांदे यांच्या प्रयत्नांना यश

नांदगाव 56 खेडी पाणीपुरवठा योजना ही कालबाह्य झाल्यामुळे अनेक वेळा नादुरूस्त होणे, पाणी वितरणात...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) " जागतिक उच्च रक्तदाब दिन " साजरा केला...

read more
.